कणकवली : ओसरगाव पटेलवाडी बाराचा मांड येथे रविवार, ६ एप्रिलला विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी रामनवमी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. सकाळी १० वाजता पुराणवाचन, दु. १२ वाजता रामजन्म सोहळा १२:३० वा. महाप्रसाद, सायं. ७ वा. दीपोत्सव, सायं. ७.३० वाजल्यापासून विविध सांस्कृतिक कार्यक्रम, रात्री १०.३० वा. लोकराजा कै. श्री सुधीर कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ, नेरूर यांचा प्रयोग सादर होईल. या उत्सवात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ओसरगाव – पटेलवाडी सहकारी मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
ओसरगाव येथे रविवारी रामनवमी उत्सव…
