मालवण बसस्थानक नवीन इमारतीचे आमदार निलेश राणे यांनी केली पाहाणी…

⚡मालवण ता.०२-: मालवण बसस्थानक जुनी इमारत जीर्ण झाली आहे. नवीन इमारतीचे बांधकाम सुरु असून अंतिम टप्प्यात आहे. लवकरच ही इमारत प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल. याठिकाणी सेल्फी पॉईंट, हायमास्ट टॉवर उभारणीही केली जाणार आहे. या पाश्वभूमीवर नवीन आणि जुन्या दोन्ही इमारतींची पाहाणी आमदार निलेश राणे यांनी केली. तसेच अधिकारी वर्गाला आवश्यक सुचना दिल्या.

दरम्यान, जुनी इमारत पाडण्याची कार्यवाही हाती घेण्यात आली असून साहित्य नव्या इमारतीत नेले जाणार आहे. लवकरच नव्या इमारतीचे लोकार्पण होणार आहे. अशीही माहिती यावेळी देण्यात आली.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, संजू परब, जिल्हा संघटक महेश कांदळगांवकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर शहर प्रमुख बाळू नाटेकर, उपतालुका प्रमुख अरुण तोडणकर, खरेदी विक्री संघ संचालक आबा हडकर, युवासेना जिल्हा प्रमुख ऋतिक सामंत, युवतीसेना जिल्हा प्रमुख सोनाली पाटकर, अंजना सामंत, मधुरा तुळसकर, माजी जिल्हा सचिव किसन मांजरेकर, राजू बिडये, भाऊ मोर्जे, मंदार लुडबे, संदीप भोजने, ऋषिकेश सामंत, कोदे यांसह अन्य पदाधिकारी तसेच एसटी विभागाचे अधिकारी आगार व्यवस्थापक अनिरुद्ध सूर्यवंशी, स्थानक प्रमुख स्वप्निल गडदे व अन्य कर्मचारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page