⚡मालवण ता.०१-:
टोपीवाला बास्केटबॉल क्लबच्यावतीने खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरी-सिंधुदुर्ग एकदिवसीय खुला गट बास्केटबॉल स्पर्धा दि. ९ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता टोपीवाला हायस्कूल, मालवण येथे होणार आहेत.
स्पर्धेत प्रथम पारितोषिक १५,००० रुपये व चषक, द्वितीय पारितोषिक १०,००० रुपये व चषक तसेच बेस्ट रायझिंग स्टार १,००० रुपये व चषक, बेस्ट डिफेन्स ५०० रुपये व चषक, बेस्ट शूटर ५०० रुपये व चषक, बेस्ट डिबलर ५०० रुपये व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी प्रसाद चव्हाण ९८३४८४७५६७ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
