⚡बांदा ता.०१-: प.पू.ब्रम्हलीन सदगुरू श्रीनवनीतानंद महाराज ( मोडक महाराज ) स्थापित स्वामी समर्थ मठ डोंगरपाल-डिंगणे येथे श्री स्वामी समर्थ प्रकट दिन विविध धार्मिक कार्यक्रमांनी व भाविकांच्या अलोट गर्दीत उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी सकाळी स्वामी पादुकांवर अभिषेक, आरती आणि होम हवन दुपारी महाप्रसाद/भंडारा, भजन आणि हरिपाठ, आरती आणि पालखी प्रदक्षिणा, रात्री मोरेश्वर दशावतार नाट्य मंडळ मोरे यांचा वैष्णवी महीमा हा नाट्यप्रयोग साजरा करण्यात आला. यावेळी हजारो भाविकांनी स्वामी मठात दर्शन घेत प्रगट दिन उत्साहात साजरा केला.
फोटो:-
डिंगणे येथील मठात श्री स्वामी समर्थ प्रगट दिन साजरा करण्यात आला.
डिंगणे येथे श्री स्वामी समर्थ प्रकट दिन उत्साहात साजरा…
