⚡मालवण ता.२८-:
मालवण शहरातील रॉक गार्डन मध्ये पर्यटकांसाठी प्रवेश शुल्क प्रति व्यक्ती रु. ५ वरून रु. १० इतके आकारण्यात येणार आहे, अशी माहिती मालवण नगरपालिका प्रशासनाने दिली आहे.
मालवण नगरपरिषदेच्या वार्षिक अर्थसंकल्प सन २०२५-२६ मध्ये प्रस्तावित केल्याप्रमाणे दि. एप्रिल २०२५ पासून रॉक गार्डन प्रवेश शुल्क प्रति व्यक्ती रु.५ ऐवजी प्रति व्यक्ती रु.१० प्रमाणे आकारण्यात येणार आहे. तसेच मालवण शहरातील स्थानिक रहिवासी यांना यातून सूट देण्यात आलेली असल्याने स्थानिक रहिवासी यांना प्रवेश विनामुल्य असेल. परंतु शहरातील नागरिकांनी रॉक गार्डन मध्ये प्रवेश करतेवेळी आधार कार्ड किंवा अन्य खात्रीदायक पुरावा सादर करणे अनिवार्य असून नागरिकांनी पुरावा सादर न केल्यास प्रवेश शुल्क आकारण्यात येईल, याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे मालवण नगरपालिका प्रशासनाने म्हटले आहे.
