राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश…

⚡सावंतवाडी ता.२९-: चराठा येथील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला.
यावेळी चराठा ग्रामपंचायत सदस्य गौरी सागर गावडे,स्वरांजली पावसकर, नतालिन डीसोजा, लावदिन डिसोजा, स्वाती चिंदरकर,संचिता गावडे,अमिता गावडे,शीतल म्हसकर, फातिमा डिसोजा,संदीप बांदेकर,अनंत गावडे,महेश नाईक, ग्रासीन डिसोजा, संजना वाडेकर,अनुजा कानसे,पंढरीनाथ कदम, तारीका गावडे, अथर्व दळवी,भूमिका दळवी,चेतन चिंदरकर,कुणाल गावडे,आकाश गावडे, यासिन मुलानी, समीर चितारी यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला.

या पक्षप्रवेशावेळी सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख सन्मा. संजू परब यांच्यासह तालुकाप्रमुख श्री. बबन राणे, माजी पंचायत समिती अशोकजी दळवी, चराठा सरपंच सौ.प्रचिती कुबल, विभाग प्रमुख श्री.राजू कुबल , क्लेटस फर्नांडिस उपस्थितीत होते.

You cannot copy content of this page