आंबोली, ता.२७: काजू पल्प बनवणारे यंत्र दोन दिवसात शुभारंभ करण्यात येईल.सिंधुदुर्ग रत्नागिरी मध्ये ३२०० कोटी चा काजू फुकट खराब होत असल्याबाबत ब्राझील मध्ये शिष्ट मंडळ पाठवून त्यावर उपाययोजना अंमलात आणणार आहे.हत्ती संदर्भात कर्नाटक येथे शिष्टमंडळ पाहणी साठी पाठवले आहे.वन मंत्री सोबत बैठक घेऊन निर्णय होईल. शिवसेना प्रवक्ते पदाची जबाबदारी पुन्हा गुढी पाडव्यापासून आपण सांभाळणार आहोत. या बाबत पत्रकार परिषदेत आंबोली येथे आमदार दीपक केसरकर यांनी माहिती दिली.यावेळी जिल्हाध्यक्ष संजू परब,प्रेमानंद देसाई उपस्थित होते. यावेळी केसरकर् म्हणाले,” बाळासाहेब ठाकरे हे अवघ्या महाराष्ट्राचे आहेत त्यांनी महाराष्ट्र धर्म जोपासला.प्रबोधनकार ठाकरे यांनी आपल “बाळ” महाराष्ट्राच्या झोळीत टाकले संयुक्त महाराष्ट्र मुंबई च्या चळवळीत.तेव्हापासून बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राचे आहेत. पक्षाची भूमिका माध्यमांसमोर गुढी पाडव्या नंतर प्रवक्ते म्हणून सातत्याने मांडणार. हक्क भंग समिती मध्ये कुणाल कामरा हे प्रकरण असून त्यावर निर्णय होईल. दिशा सालियन प्रकरणी फॉरेन्सिक अहवालात बलात्कार झाला नसल्याबाबत अहवाल आला त्यावर प्रतिकीया देताना त्यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री प्रतिक्रिया देतील.असे सांगून बोलण्यास नकार दिला.
गुढी पाडव्यापासून प्रवक्ते म्हणून केसरकर सांभाळणार शिवसेना पक्षाची नवी जबाबदारी…
