⚡आंबोली,ता.२६ अनिल चव्हाण-: येथील जकात वाडी येथे सांबराच्या पिल्लाला रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाने ठोकरल्याने जागीच मृत्यू झाला. वनविभागाने ताब्यात घेऊन जाळले. आंबोली जकातवाडी येथील अनिल चव्हाण यांच्या घराजवळ रस्ता ओलांडताना एका सांबराच्या पिल्लाला अज्ञात वाहनाने ठोकरल्याने धडक बसली पायावरूनही चाक गेले त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. यानंतर रेक्यू टीम चे प्रथमेश गावडे,राकेश अमृस्कर ,वसंत गावडे यांनी मृत सांबर वनविभाग कार्यालया जवळ नेऊन वन विभागाने जाळले.
रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाने ठोकरल्याने सांबराच्या पिल्लाचाजागीच मृत्यू…
