फोंडाघाट येथील युवकाची गळफास घेऊन आत्महत्या…

⚡कणकवली ता.२५-: फोंडाघाट मारुतीवाडी येथील युवकाने फोंडाघाट प्राथमिक शाळा नं. १च्या व्हरांड्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. फोंडाघाट मारुतीवाडी येथील ३७ वर्षीय युवक अभिनव अरुण म्हसकर या युवकांने मारुतीवाडी येथील जि प प्राथमिक शाळा नं. १ च्या बाहेरील व्हरांड्यात दोरी च्या सहाय्याने गळफास घेऊन सोमवार रात्री ते मंगळवार पहाटेच्या दरम्याने आत्महत्या केली. याबाबत मंगळवारी सकाळी मुले शाळेत आल्यानंतर घटना समजली. मयत अभिनव याचा भाजी विक्रीचा व्यवसाय होता. सोमवारी बाजारच्या दिवशी दिवसभर बाजारपेठ येथे भाजी विक्री करत होता असे सांगण्यात येते. तसेच रात्री 10 वाजताच्या मारुतीवाडी येथील ग्रामस्थांच्या मिटिंग मध्येही अभिनव हजर असल्याचे तेथील ग्रामस्थांकडून सांगण्यात येत होते

मयत अभिनव म्हसकर याच्या पश्चात आई वडील, मोठा भाऊ, वहिनी असा परिवार आहे. सदर घटनेची माहिती समजताच फोंडाघाट आउट पोस्ट चे ठाणे अंमलदार वंजारे व कणकवली पोलीस घटनास्थळी हजर झाले होते.

You cannot copy content of this page