कलमठ विकास सोसायटी चेअरमन पदी आत्माराम उर्फ बबन गुरव यांची निवड…

कणकवली : कलमठ विकास सोसायटीचेअरमन अध्यक्षपदाची निवडणूक आज कलमठ विकास सोसायटी कार्यालयात पार पडली. माजी चेअरमन रघुनाथ कोरगावकर यांच्या निधनाने चेअरमन पद रिक्त होते. आज निवडणूक अधिकारी सौ भोगले मॅडम यांच्या उपस्थितीत आज निवडणूक प्रक्रिया पार पडली. चेअरमन पदासाठी एकमेव अर्ज दाखल झाल्याने आत्माराम उर्फ बबन गुरव यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी सरपंच संदीप मेस्त्री, माजी पंस सदस्य महेश लाड, व्हाइस चेअरमन सुनील मेस्त्री, विजय चिंदरकर, हमजा शेख, महेंद्र कदम, रमेश चव्हाण, निसार शेख, दिनेश गोठणकर, पपू यादव, उदय मर्तल, राजेंद्र नारकर, गुरु वर्देकर, दर्शना कुडाळकर, बाबू नारकर, संतोष रेवंडकर, अभिजीत गुरव, श्रेयस चिंदरकर, समर्थ कोरगावकर उपस्थित होते.

You cannot copy content of this page