कणकवलीत २५ रोजी नाट्यशास्त्र नोंदलेखन कार्यशाळेचे आयोजन…

कणकवली : महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ व वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, २५ मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत आचरेकर प्रतिष्ठानच्या सभागृहात नाट्यशास्त्र नोंदलेखन कार्यशाळा आयोजित केली आहे. या कार्यशाळेत मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे सदस्य वामन पंडित, संपादकीय सहायक वर्षा देवरुखकर मार्गदर्शन करणार आहेत. वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अॅड. एन. आर. देसाई व मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे सचिव डॉ. शामकांत देवरे यांची उपस्थिती असणार आहे. कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे सहायक सचिव ललित कुडमथे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page