५ किलो मिळणार धान्य:गीते यांची माहिती
सिंधुदुर्गनगरी-:कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावास प्रतिबंध व्हावा याकरिता अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत अंत्योदय अन्न योजनेच्या व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना 1 महिन्याकरीता मोफत अन्नधान्य गहू व तांदुळ वाटप करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. त्यानुसार 1 महिन्याकरिता अन्नधान्याचे मोफत वाटप करण्यात येणार असून ज्या लाभार्थ्यांने माहे एप्रिल 2021 साठी देय असलेले अन्नधान्य यापूर्वीच खरेदी केले असेल, त्या लाभार्थ्यांस माहे मे 2021 साठी देय असलेल्या अन्नधान्य अंत्योदय अन्न योजनेच्य लाभार्थ्यास प्रतिमाह प्रतिशिधापत्रिका 35किलो अन्नधान्य व प्राधन्य कुटुंबाच्या लाभार्थ्यांस प्रतिमाह प्रतिव्यक्ती 5 किलो अन्नधान्य मोफत देण्यात येणार आहे.तसेच ज्या लाभार्थ्यांने माहे एप्रिल 2021 साठी त्या लाभार्थ्यांस देय असलेले अन्नधान्ये खरेदी केले नसेल,त्या लाभार्थ्यांस माहे एप्रिल 2021 साठी देय असलेले अन्नधान्य अंत्योदय अन्न योजनेच्या लाभार्थ्यांस प्रतिमाह प्रतिशिधापत्रिका 35 किलो अन्नधान्य व प्राधान्य कुटुंबाच्या लाभार्थ्यांस प्रतिमाह प्रतिव्यक्ती 5 किलो अन्नधान्य मोफत देण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राध्यन्य कुटुंब योजनेतील पात्र लाभार्थ्यांनी सदर मोफत अन्नधान्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गिते यांनी केले आहे.
