शिवभोजन केंद्रावर पार्सल पद्धतीने मिळणार मोफत भोजन एक महीना सवलत

सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 12 शिवभोजन केंद्रांना मंजरी देणेत आलेली असून त्याचा दैनिक इष्टांक 825 एवढा आहे. वेंगुर्ला तालुका वगळता सद्यास्थीत 11 शिवभोजन केंद्र कार्यरत आहेत. राज्य शासनाने उपहारगृहे, हॉटेल यांना फक्त पार्सल सुविधेचा परवानगी दिली आहे. त्याअनुषंगाने शिवभोजन केंद्रावर निर्जंतुकीकरण्याच्य नियमांचे पालन करुन एक महिन्यार्पत पार्सल सुविधेव्दारे ग्राहकांना शिवभोजन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. सद्यास्थीतीत सुरु असलेल्या शिवभोजन केंद्रांच्या इष्टांकामध्ये एक महिन्याकरिजता दीड पट वाढ करण्यात आलेली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून 1237 गरीब व गरजू जनतेला मोफत शिवभोजन थाळीचा लाभ घेणे शक्य होणार आहे. कोरोनाचे पार्श्वभूमिवर निर्जंतुकीकरणाच्या नियमांचे पालन करुन शिवभोजन केंद्रातून सकाळी 7.00 ते 11.00 या कालावधीत किंवा जिल्हाधिकारी यांनी वेळोवेळी आदेशात नमूद केलेल्या वेळेनुसार पार्सल सुविधेव्दारे गाहकांना मोफत शिवभोजन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त्‍ गरजू जनतेने शिवभोनेचा लाभ घ्यावा. आतापर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील 212976 गरजू जनतेने शिवभोजन योजनेचा लाभ घेतला असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गिते यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page