कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आरोग्य यंत्रणा व प्रशासकीय यंत्रणा अपुरी पडत आहे. कोविडची लक्षणे, उपचारादरम्यान आरोग्य सल्ला देण्यासाठी भारतातील विविध वैद्यकीय संघटना आणि स्टार्ट- अप उद्योजक एकत्रित येवून कोविड विषयी मार्गदर्शन करण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेवून porject step one सुरु केला आहे. या अंतर्गत लोकांना कोविडची लक्षणे, उपचारादरम्यान होणारा त्रास याविषयी प्राथमिक मार्गदर्शन केले जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे लोक स्वयंसेवक म्हणून काम करुन आरोग्य यंत्रणेला घरबसल्या मदत करण्यसाठी इच्छूक आहेत. त्यांनी bit.ly/TakeStepOneNow या लिंक वर जाऊन नोंदणी करावी. नोदणीनंतर आपणांस योग्य प्रशिक्षण देण्यात येईल. समाजसेवा म्हणून या महामारीच्या कठीण काळात आपला सहभाग द्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.
कोविड मार्गदर्शनासाठी सहकार्य करण्याचे आवाहन…
