राजीनामा दिलेले म्हापसेकर जी प सभेला उपस्थित..

विशेष सभेत झाले होते ऑनलाईन सहभागी

*💫सिंधुदुर्गनगरी दि.२३-:* जिल्हा परिषद सदस्य पदासह उपाध्यक्ष पदाचा राजिनामा दिलेले राजेंद्र म्हापसेकर शुक्रवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या विशेष सभेला ऑनलाईन उपस्थित होते. त्यामुळे म्हापसेकर हे सदस्य म्हणून कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, सभेमध्ये विषय समिती सभापती पदांचे खातेवाटप करण्यात आले असून वित्त व बांधकाम सभापती पद महेंद्र चव्हाण यांना तर शिक्षण व आरोग्य सभापती पद डॉ अनिशा दळवी यांना देण्यात आले. ऑनलाईन पद्धतीने जिल्हा परिषदेची विशेष सभा संजना सावंत यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर, सभापती महेंद्र चव्हाण, डॉ अनिशा दळवी, शर्वाणी गांवकर, सभा सचिव तथा सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, सत्ताधारी गटनेते रणजीत देसाई, विरोधी गटनेते नागेंद्र परब, सदस्य संतोष साटविलकर, संजय पडते, संजय देसाई, हरि खोबरेकर, जेरॉन फर्नांडिस, प्रदीप नारकर, सुधीर नकाशे, सुनील म्हापणकर, मानसी जाधव, पल्लवी झिमाळ, शारदा कांबळे, मायकल डिसोझा, सावी लोके, रोहिणी गावडे, श्वेता कोरगांवकर, प्रितेश राऊळ यांच्यासह अन्य सदस्य, खातेप्रमुख व अधिकारी उपस्थित होते. यावेळी कोरोनामुळे निधन झालेल्या व्यक्तीना व शहिद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच नूतन अध्यक्ष व विषय समिती सभापती यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला. यावेळी रखडलेले सभापती खातेवाटप करण्यात आले. २६ मार्च रोजी समाजकल्याण व महिला बाल कल्याण या दोन विषय समिती सभापती पदांसह वित्त व बांधकाम, शिक्षण व आरोग्य सभापती पदासाठी निवडणूक झाली होती. यातील वित्त व बांधकाम, शिक्षण व आरोग्य ही दोन पदे जिल्हा परिषदेच्या विशेष सभेत निश्चित करायची असतात. परंतु त्यानंतर जिल्हा परिषद सभा न झाल्याने ही नियुक्ती रखडली होती. शुक्रवारी झालेल्या सभेत वित्त व बांधकाम सभापती म्हणून श्री चव्हाण तर शिक्षण व आरोग्य सभापती म्हणून डॉ सौ दळवी यांची निवड सभाध्यक्षा संजना सावंत यानी जाहिर केली. यावेळी विषय समितीच्या रिक्त सदस्य पदासाठी नामनिर्देशन पत्र प्राप्त न झाल्याने ही निवड प्रक्रिया प्रलंबित ठेवण्यात आली.

You cannot copy content of this page