जिल्हा बँकेचा कारभार पावणे दहा ते चार या वेळेत..

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय:-सीईओ देसाई

सिंधुदुर्गनगरी ता २३ कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कामकाजाच्या वेळेत बदल करण्यात आला असून नव्या बदलानुसार बँकेच्या सर्व शाखांमध्ये सकाळी ९.४५ ते दुपारी ४ वाजेपर्यंत कामकाज चालेल. तर देव-घेवी साठी वेळ दुपारी २ वाजेपर्यंत राहील. असे जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. संपूर्ण राज्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना महामारी चा वेग झपाट्याने वाढला आहे. एकंदर परिस्थिती चा विचार करता सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कामकाजाच्या वेळेत बदल करण्यात आला असून नव्या बदलानुसार जिल्हा बँकेच्या शहर शाखा सह सर्व शाखांच्या कामकाजाची वेळ सकाळी ९.४५ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत राहील. तसेच देव- घेवीची वेळ दुपारी २ वाजेपर्यंत राहील. बँकेच्या प्रधान कार्यालयाची कामकाजाची वेळ सकाळी १०.१५ ते सायंकाळी ४.१५ पर्यंत राहील. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या कामकाजातील वेळेचे बदल हे २३ एप्रिल ते ७ मे २०२१ पर्यंत राहतील. तरी बँकेच्या सर्व कर्मचारी व ग्राहकांनी याची नोंद घ्यावी .असे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई यांनी कळविले आहे.

You cannot copy content of this page