राज्य सरकारी पतसंस्थेत कार्यालयीन वेळ सकाळी १० ते २…

*💫सिंधुदुर्गनगरी दि.२३-:* सिंधुदुर्ग जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयीन वेळेत बदल करण्यात आला असून या बदलानुसार सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत कार्यालय सुरू राहील तर शनिवार व रविवार रोजी संस्थेचे कार्यालय पूर्णता बंद राहणार आहे. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष बी वाय वाडीकर यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्यात दिवसेंदिवस कोरोना चा संसर्ग वेगाने वाढत असल्यामुळे शासनाने संचारबंदी लागू केली आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्थेची कार्यालयीन वेळ संचारबंदी असेपर्यंत सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत करण्यात आली आहे. तसेच शनिवार व रविवार संस्थेचे कार्यालय पूर्णता बंद राहणार आहे. तरी संस्थेच्या सर्व सभासदांनी याची नोंद घेऊन संस्थेला सहकार्य करावे. असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष डी वाय वाडीकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page