*सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे फायर ऑडिट करण्याची जिल्हाधिकाऱ्यांना करणार मागणी

*नगराध्यक्ष संजू परब यांची माहिती*

सावंयवाडी: विरार येथे झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहरातील रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करणार असल्याची माहिती नगराध्यक्ष संजू परब यांनी दिली आहे. विरारच्या दुर्घटनेनंतर खबरदारी म्हणुन हा निर्णय घेण्यात आला असून विरार येथे कोव्हीड रुग्णालयात आग लागल्याने १३ रुग्ण दगावले आहेत. त्यामुळे फायर ऑडिटचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे शहरातील रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याची मागणी करणार असल्याची माहिती नगराध्यक्ष संजू परब यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page