वनविभागाकडून राबविण्यात आली होती मोहीम
*💫आंबोली दि.२३-:* येथील अनेक ग्रामस्थांवर हल्ला करणाऱ्या त्या कोळसुदा या प्राण्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. यावेळी त्या प्राण्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाकडून १०-१२ तासाची मोहीम राबवावी लागली आहे. या प्राण्याने नागरिकांवर हल्ला करत जख्मी केले होते. त्यामुळे गावात भितीचे वातावरण निर्माण झाले होते.
