निलेश राणेंन सारख्या नेत्याचा कार्यकर्ता म्हणून काम करताना निश्चितच अभिमान वाटतो…

संजू परब:भविष्यात मंत्री म्हणून ते आपला वाढदिवस साजरा करतील..

⚡सावंतवाडी ता.१६-: गेली १५ वर्षे मी निलेश राणे यांच्यासोबत काम करीत आहे. शब्द पाळणारा, मैत्रीला जपणारा नेता, तरुणांचा आयडॉल असा आवडता नेता म्हणून निलेश राणे यांची ओळख आहे. आज प्रखर हिंदुत्ववादी भूमिका घेऊन ते राज्यभर काम करीत आहेत. विधिमंडळात एक अभ्यासपूर्ण आमदार म्हणून त्यांनी छाप पाडली आहे. अशा नेत्याचा कार्यकर्ता म्हणून काम करताना निश्चितच अभिमान वाटतो.असे प्रतिपादन सावंतवाडी चे माजी नगराध्यक्ष तथा शिंदे शिवसेनेचे जिल्हा संघटक संजू परब यांनी आज येथे केले.

दरम्यान येणारा काळ हा निलेश राणे यांचाच असून भविष्यात मंत्री म्हणून ते आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी निश्चितच येतील असा विश्वास आहे ही श्री परब यांनी यावेळी व्यक्त केला.

You cannot copy content of this page