आ. निलेश राणे हे सर्वसामान्यांचा आवाज असणारे नेतृत्व…

आम. दीपक केसरकर: सह्याद्री फाउंडेशन, संजू परब मित्र मंडळ,व शिवसेनाच्या माध्यमातून सावंतवाडी त निलेश राणे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा..

⚡सावंतवाडी ता.१६-:
ज्यांच्या रक्तातच समाजसेवा आहे त्या राणे कुटुंबांचे निलेश राणे एक सदस्य आहेत. १९९० पासून राणे जिल्ह्यात आल्यानंतर या जिल्ह्यात खूप मोठं परिवर्तन घडलं. राणेनी कोकणासाठी जे काही केलं त्याची भरपाईच लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशातून सिद्ध झाली. त्यांच्यासोबतच आज त्यांची दोन्ही मुलं निलेश व नितेश त्यांचा समाजसेवेचा वसा जपत आहेत. आ. निलेश राणे हे सर्वसामान्यांचा आवाज असणारे नेतृत्व असून खासदार म्हणून त्यांनी खूप मोठं कार्य केलं होतं. आता आमदार म्हणूनही ते अत्यंत अभ्यासपूर्ण काम करत आहेत. त्यांना दीर्घायुष्य लाभो व याही पुढेही त्यांच्या हातून कोकण विकासाचं खूप मोठं कार्य घडो अशा शब्दांत माजी मंत्री आ. दीपक केसरकर यांनी निलेश राणे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
सावंतवाडी येथील हॉटेल मॅंगोच्या सभागृहात संजू परब मित्र मंडळ व सह्याद्री फाउंडेशन यांच्या माध्यमातून आ. निलेश राणे यांचा वाढदिवस शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर आ. दीपक केसरकर, शिवसेना जिल्हा संघटक संजू परब, जिल्हा प्रमुख अशोक दळवी, जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, विधानसभा मतदारसंघ प्रमुख प्रेमानंद देसाई, तालुका प्रमुख बबन राणे, शहर प्रमुख बाबू कुडतरकर, जावेद खतिब, गुरुनाथ सावंत, मंदार नार्वेकर, जिल्हा बँक संचालक विद्याधर परब, दिनेश गावडे, भाजप शहरप्रमुख अजय गोंदावळे, सह्याद्री फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील राऊळ, प्रल्हाद तावडे, सुजित कोरगावकर, प्रसन्ना शिरोडकर यांसह पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page