कुडाळ मॉन्सून रन ठरली बेस्ट रेटेड हाफ मॅरेथॉन..

मुंबई रोड रनर तर्फे आयोजकांचा सन्मान:राणे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने केले होते मॅरेथॉन आयोजन..

कुडाळ : राणे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेन्टर, कुडाळ यांच्या मार्फत आयोजित करण्यात आलेल्या ‘कुडाळ मॉन्सून रन’ला ‘बेस्ट रेटेड हाफ मॅरेथॉन ऑफ द इयर २०२४ या किताबाने सन्मानित करण्यात आले आहे. मुंबई रोड रनर या संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व मॅरेथॉन मधून कुडाळ मॉन्सून रनची हाफ मॅरेथॉन गटात निवड करण्यात आली. अलिकडेच मुंबईत झालेल्या सोहळ्यात राणे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर कुडाळचे ए टी राणे आणि डॉ. जी टी राणे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह हा सन्मान स्वीकारला.
या सोहळ्यात कुडाळ मान्सून रनला ‘बेस्ट रेटेड हाफ मॅरेथॉन ऑफ द ईयर 2024’ च्या सन्मानाने सन्मानित करण्यात आले तर टाटा मॅरेथॉनला बेस्ट रेटेड फूल मॅरेथॉन ऑफ द ईयर 2024 ने सन्मानित करण्यात आले.
मुंबई रोड रनर या संस्थेमार्फत महाराष्ट्र व इतर जवळच्या झालेल्या सर्वे मध्ये कुडाळ मान्सून रन ही पहिली ठरली.
मुंबई रोड रनर सर्व मोठ्या मॅरेथॉनला रेटिंग देते.
कुडाळ मान्सून रन ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रथमच आयोजित मान्सून मॅरेथॉन होती. पहिल्याच आयोजनामध्ये एवढी मोठी गरुड भरारी घेतल्यामुळे आयोजकांचे सर्वत्र कौतुक होतं आहे. मुंबई रोड रनरच्या परीक्षकांनी सुद्धा आयोजकांचे खूप कौतुक केले.
कुडाळ मान्सून रन ही राणे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेन्टर, कुडाळ यांच्या मार्फत ‘हेल्थ अवेरनेस‘ म्हणून दरवर्षी घेण्यात येणार आहे. यासाठी सुद्धा त्यांचेही कौतुक मुंबई रोड रनरच्या सोहळ्यात करण्यात आले.

You cannot copy content of this page