आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य..
⚡कुडाळ ता.१४-: आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार दि. १७ मार्च रोजी शिवसेना महिला तालुका प्रमुख सिद्धी शिरसाट आयोजित भव्य आंतरराज्यस्तरीय गृप डान्स स्पर्धा 2025 चे आयोजन करण्यात आले आहे. कुडाळ येथिल पोस्ट कार्यालयासमोर सिंधुराजा पटांगणावर रात्री 9 वाजता ही स्पर्धा सुरू होणार आहे.
या स्पर्धेसाठी पहिल्या तीन क्रमांकाना अनुक्रमे रोख रु. २१ हजार, ११ हजार आणि ७ हजार आणि आकर्षक चषक, तसेच उत्तेजनार्थ दोन क्रमांकासाठी प्रत्येकी २ हजार ५०० आणि चषक दिले जाणार आहेत.
या स्पर्धेचे उदघाटन शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत आणि प्रमुख पदाधिकऱ्यांच्या उपस्थितीत होणार आहे. रात्री ८ वाजता संकष्टी चतुर्थी निमित्ताने अभंग भजन मंडळाचे भजन सादर होणार आहे.
ग्रुपडान्स स्पर्धेत सहभागी होण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी नागेश नेमळेकर (9404164391 / 9823177201) किंवा दिपलक्ष्मी पडते (9730878579) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
