विज्ञान हे मानवासाठी वरदान आहे हे सिद्ध करूया…

विजयश्री देसाई :५७ विज्ञान प्रतिकृतीचे सादरीकरण…

⚡मालवण ता.१४-:
विज्ञान हे मानवासाठी वरदान आहे. यासाठी आज प्रयत्न होणे गरजेचे आहे. प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी नवनवीन प्रयोगातून हे दाखवण्याचा प्रयत्न केला असून सकारात्मक विचार ठेवून विज्ञानाचा विचार मानवतेसाठी केला पाहिजे यासाठी हे विज्ञान मानवतेसाठी आहे हे सिद्ध करूया असे प्रतिपादन कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव श्रीमती विजयश्री देसाई यांनी वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टाच्या आंतरशालेय विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्ताने आयोजित विज्ञान कार्यक्रमात काढले.

कट्टा येथील वराडकर हायस्कूल या प्रशाळेत विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले होते त्याचे उद्घाटन श्रीमती विजयश्री देसाई यांच्या हस्ते झाले
यावेळी कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे स्कूल कमिटी अध्यक्ष सुधीर वराडकर मुख्याध्यापिका देवयानी गावडे पर्यवेक्षक व विज्ञान प्रमुख महेश भाट सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते

या प्रशालेतून इयत्ता ५ वी ते ९वी या गटातून डॉ. सी. व्ही. रमन व जयंत नारळीकर अशा दोन दालनातून एकूण ५७ प्रतिकृती सादर केल्या गेल्या. या प्रतिकृतीतून विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टीकोनाचा मागोवा घेण्यात आला. तसेच यशस्वी विद्यार्थ्याचे अभिनंदन करण्यात आले.

या विज्ञान प्रदर्शनाचा निकाल पुढीलप्रमाणे-
गट पाचवी ते सातवी- प्रथम – प्रतिकृतीचे नाव -व्याक्युम क्लिनर- पलक महाभोज, वेदिका भोजने, द्वितीय- प्रतिकृतीचे नाव – रेन डिटेक्शन -वेदान म्हाडगुत, तेजस मेस्त्री, निखिलेश मेस्त्री, तृतीय-
प्रतिकृतीचे नाव – सांडपाणी व्यवस्थापन – चंदना शेट्टी, लवली गुजर, अक्षरा शेरे.
गट आठवी ते नववी – प्रथम – प्रतिकृतीचे नाव- इलेक्ट्रोप्लेटिंग- स्वरा पेंडुरकर, ईशा ताम्हणकर, द्वितीय- प्रतिकृतीचे नाव – पवन ऊर्जा- ओंकार रोहीलकर, आयुष कोत्रे, तृतीय- प्रतिकृतीचे नाव – वॉटर पुरिफायर- यामिनी म्हाडगूत, सिद्धी महाभोज.
प्रशालेच्या या विज्ञान उपक्रमाबद्दल कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त कर्नल शिवानंद वराडकर, ॲड. सोनू पवार, अध्यक्ष अजयराज वराडकर, सचिव सुनील नाईक, उपाध्यक्ष आनंद वराडकर, शेखर पेणकर, खजिनदार श्याम पावसकर व सर्व संचालक व सल्लागार यांनी यशस्वी विद्यार्थ्याच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page