हडी जठारवाडी शाळा नंबर 2 येथे आयोजित मोफत आरोग्य शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद…

⚡मालवण ता.०९-: हडी जेष्ठ नागरिक संघ हा सर्वांसाठी विविध उपक्रम राबवत असतो.संघाच्या सर्व उपक्रमांना प्रतिसाद सुद्धा तितकाच चांगला लाभतो. केवळ ज्येष्ठांच्या नाहीतर सर्वांच्या आरोग्याची काळजी घेणारा हा आरोग्य शिबिराचा उपक्रम इतर जेष्ठ नागरिक संघानी सुद्धा अनुकरण करावा असाच आहे. या संघास भविष्यात आवश्यक असलेले सर्वतोपरी सहकार्य ग्रामपंचायतच्या माध्यमातून करण्यात येईल असे प्रतिपादन हडी सरपंच प्रकाश तोंडवळकर यांनी येथे केले.

फेस्कॉन सलग्न ज्येष्ठ नागरिक सेवा संघ हडी च्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त हडी जठारवाडी शाळा नंबर 2 येथे मोफत आरोग्य शिबिर रविवारी आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा 70 ग्रामस्थांनी लाभ घेतला. शिबिरामध्ये डायबिटीस,अस्थमा, हिमोग्लोबिन, थायरॉईड याची मोफत तपासणी करण्यात आली. यावेळी माधवबाग येथील डॉक्टर अमेय पाटकर, डॉ स्वप्न जाधव, रुपेश सोनावडेकर, संजना परब, अमिता मटकर, रिया कोचरेकर, रोहित हळवी, संजय मळगावकर उपस्थित होते. शिबिरामध्ये आयुर्वेदिक औषधे मोफत देण्यात आली. शिबिराचा शुभारंभ सरपंच प्रकाश तोंडवळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलन करून करण्यात आला.

यावेळी संघाचे अध्यक्ष देविदास सुर्वे, उपाध्यक्ष श्रीमती आरती कदम, सचिव सुभाष वेंगुर्लेकर, उपसचिव भालचंद्र सुतार, कोषाध्यक्ष प्रभाकर सुतार, सल्लागार चंद्रकांत पाटकर, सदस्य महादेव सुर्वे, जानु कदम, अनंत घाडी, रमेश कावले, प्रभाकर चिंदरकर, दिनकर सुर्वे, उमेश हडकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार चंद्रकांत पाटकर यांनी मानले.

You cannot copy content of this page