⚡आंबोली,ता.०८-: येथील जकातवाडी येथे आज एक हत्ती दाखल झाला. स्वामी समर्थ मठ येथून जकातवाडी येथील अनिल चव्हाण यांच्या घरासमोरील अनंत विसावा हॉटेल तसेच तेथील झुडूपात हत्ती दिसून आला.
कुत्र्यांनी कल्ला केला. यावेळी वन विभागाच्या वन क्षेत्रपालं प्रमिला शिंदे, वन रक्षक वासुदेव खोत , बदाम राठोड, वसंत गावडे,बाळा गावडे, शिवराम गावडे रेस्कू टीम चे प्रथमेश गावडे,राकेश अमृस्कर यांनी याठिकाणी पाहणी केली.मात्र हत्ती काळोखात घुतमळत राहिला. मात्र पुन्हा काही वेळाने तिथेच दिसून आला. यावेळी जकातवाडी तसेच बाजार वाडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने हत्ती बघण्यासाठी उत्सुक होते.
