ओरोस ता ८
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंमली पदार्थ सेवन, वाहतूक, साठवणूक, विक्री, परराज्यातून जिल्ह्यात होणारी तस्करी रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयातील स्थानिक गुन्हे शाखा तसेच पोलीस ठाणेस्तरावरही कारवाईसाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आलेली आहेत. अंमली पदार्थ विरोधी कारवाईसाठी ५ मार्च ते ५ एप्रिल २०२५ या कालावधीत विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या अनुषंगाने ७ मार्च रोजी गांजा सेवन करण्याचे एकुण १२९ संशयीत ठिकाणी तपासणी करण्यात आली.
राबविण्यात येत असलेल्या या विशेष मोहिमेच्या कारवाईसाठी नियुक्त केलेल्या पथकांना, तसेच सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांना गोपनिय माहिती घेवून अंमली पदार्थ सेवन, ताबा, वाहतूक, विक्री, साठवणूक बाबत दर्जेदार केसेस करण्याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी यापुर्वी सूचना दिलेल्या आहेत.
या अनुषंगाने ७ मार्च रोजी पोलीस अधीक्षक अग्रवाल यांनी अंमली पदार्थ सेवन, वाहतूक, साठवणूक, विक्री रोखण्यासाठी अंत्यत गांभीर्यपूर्वक घेवुन प्राथमिक स्वरुपात अंमली पदार्थाचे समुळ उच्चाटन, रेकॉर्डवरील आरोपी, संशयीत व्यक्ती यांची तपासणी करण्याचे आदेश दिलेले होते. त्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्याच दिवशी अचानकरित्या सायंकाळी ७ ते रात्री ११ वाजता यामुदतीत सरप्राईझ तपासणी मोहिम आयोजीत केलेली होती. या मोहिमेमध्ये सर्व पोलीस अधीक्षक कार्यालयातील शाखा, उपविभागीय पोलीस अधिकारी कणकवली व सावंतवाडी तसेच सर्व पोलीस पोलीस ठाणे असे एकुण २४ पोलीस अधिकारी व ८० पोलीस अंमलदार यांनी सहभाग घेतलेला होता. या मोहिमेच्या अनुषंगाने मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार गांजा सेवन करण्याचे एकुण १२९ संशयीत ठिकाणी तपासणी करण्यात आली.
त्याचप्रमाणे ही मोहिम यशस्वी होणेसाठी महसुल, कृषी व अन्य विभाग तसेच गावांतील पोलीस पाटील, संरपंच, आशा वर्कर्स, स्वयंसेवी संस्था व लोकप्रतिनीधी यांना मदतीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात आले आहे. अंमली पदार्थ सेवन, वाहतूक, साठवणूक, विक्री याबाबत काही माहिती मिळून आल्यास तात्काळ स्थानिक पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे शाखा, डायल ११२ किंवा पोलीस नियंत्रण कक्ष येथे संपर्क करावा. आपण दिलेली माहिती गोपनीय ठेवुन संबधीत टिकाणी पोलीस विभागामार्फत कडक कारवाई करण्यात येईल, असे आवाहन करण्यात आले आहे.
अंमली पदार्थ विरोधी जिल्हा पोलिसांची विशेष मोहीम…
