नगराध्यक्ष संजू परब यांची संकल्पना : विरंगुळ्यासाठी बाकड्यांची सुद्धा व्यवस्था
*💫सावंतवाडी दि.२४-:* शहरात होणारे अपघात रोखण्यासाठी नगराध्यक्ष संजू परब यांच्या संकल्पनेतून व वृक्ष प्राधिकरण निधीतून १० ठिकाणी बहिर्वक्र आरसे बसविण्यात आले आहेत. तसेच शहरात संध्याकाळच्या वेळी नागरिकांना विरंगुळ्यासाठी बसता यावे यासाठी बँच देखील बसविण्यात आले आहेत. या दोन्ही कामाचे उद्घाटन नगराध्यक्ष संजू परब यांच्या मुख्य उपस्थितीत नगरसेवक आनंद नेवगी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले आहे. यावेळी कट्ट्यावर बॉक्सवेल देखील बसविण्यात येणार असल्याची माहिती परब यांनी दिली. यावेळी नगरसेवक नासिर शेख, नेमळे सरपंच विनोद राऊळ, केतन आजगावकर, नगरपालिका कर्मचारी आदी उपस्थित होते.
