कातवड मधील सत्तर वर्षीय आजीला चावला ‘कोब्रा’…

घरातील मंडळींनी धावाधाव करून दवाखान्यात दाखल केल्याने वाचले प्राण_

*💫मालवण दि.२४-:* मालवण तालुक्यातील कातवड येथे राहणारी आशा चंद्रकांत पवार ही सत्तर वर्षीय महिला आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सकाळी घरातुन अंगणात जाण्यासाठी दरवाजा उघडून बाहेर जात असतानाच दरवाजाच्या पायरीवर असलेल्या कोब्रा जातीच्या विषारी सापाने दंश केल्याची घटना घडली आहे दरम्यान, आशा पवार हिला सापाने चावा घेतल्याचे समजताच तिने आरडा ओरड केल्याने घरातील मंडळींनी धावाधाव करीत तात्काळ मालवण ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिच्यावर वेळीच उपचार झाल्याने तिला जीवदान मिळाले कातवड येथे राहणारी आशा चंद्रकांत पवार ही सत्तर वर्षीय महिला आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सकाळी घरातुन अंगणात जाण्यासाठी दरवाजा उघडून बाहेर आली त्यावेळी पायरीवर असलेल्या कोब्रा जातीच्या सापाने चावा घेतला यावेळी आशा पवार यांनी आरडाओरडा केल्या नंतर घरातील मंडळींनी सामाजिक कार्यकर्ते सुनील मलये यांच्या साहाय्याने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कपिल मेस्त्री व डॉ. मालविका झाटये यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू केले असता त्यांच्या जीविताला असणारा धोका टळला आशा पवार यांना सापाने चावा घेतल्यांनंतर त्यांची ऑक्सीजन पातळी अगदी ४० पेक्षा खाली आली होती तिच्यावर योग्य उपचार करीत डॉक्टरांनी तिला जीवदान दिले. सध्यस्थीतीत पवार याना डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. डॉक्टरांनी तात्काळ उपचार केल्याने आता सर्वकाही ठीक असल्याचे सांगत रुग्णाच्या नातेवाईकानी डॉक्टर व कर्मचारी यांचे आभार मानले.

You cannot copy content of this page