अतुल बंगे यांचा सवाल;मतदार संघात विकास केला म्हणून विक्रमी मतांनी ते विजयी झाले
*💫कुडाळ दि.२४-:* लोकसभा शिवसेना गटनेते खासदार विनायक राऊत यांनी आपल्या लोकसभा मतदारसंघात सातत्याने कोट्यवधीची विकास कामे केली म्हणूनच ते विक्रमी मतांनी विजयी होऊन दोन वेळा खासदार झालेत परंतु त्यांनी व्यवसाय न करता नुसती समाजसेवाच करावी का? हा जर कोणाचा समज असेल तर तो चुकीचा आहे असे मत शिवसेनेचे अतुल बंगे यांनी व्यक्त केले खासदार विनायक राऊत यांच्यावर कायमच गरळ ओकण्याचे काम विरोधक करत आहेत जहरी टीका करण्यापलिकडे त्यांच्याकडे सध्या धंदे नाहीत खासदार विनायक राऊत हे बॅ.नाथ पै. ,प्रा.मधू दंडवते यांच्या पावलावर पाऊल ठेऊन लोकसभेत वाटचाल करीत आहेत दिल्ली संसदेत त्यांनी लोकप्रिय खासदार म्हणून ‘किताब मिळविला आहे संपूर्ण मतदार संघात कोट्यवधीचा निधी आणून विकास कामे जलदगतीने केली आहेत याचा पोटशूळ विरोधकांच्या पोटात उठला आहे.लोकांची सेवा करीत असताना खासदार राऊत यांनी आपल्या घरावर तुळशीपत्रे ठेवावीत असे जर कोणाला वाटत असेल तर ते चुकीचे आहे.एखादी कंपनी मुलांसाठी रजिस्टर करणे आणि एक नंबर व्यवसाय करणे हा काय गुन्हा आहे का ? असा सवाल करीत कायमच शिवसेनेवर गरळ ओकून समाधान मानून आमचे लोकप्रिय खासदार विनायक राऊत यांची बदनामी करण्यासाठी कोणीतरी प्रयत्न करत आहे हा त्यांचा प्रयत्न हास्यास्पद आहे खासदार राऊत यांची असलेली लोकप्रियता ही कधीच कमी होत नाही उलट वाढतच चालली आहे याचे भान विरोधकानी ठेवावे असा राजकीय सल्ला बंगे यानी दिला ते म्हणाले खासदार आमदार यांनी आपला व्यवसाय करणे म्हणजे गुन्हा नाही परंतु आपण निवडून आल्यावर लोकांना छळणे हे मात्र शिवसेना लोकप्रतिनिधींनी कधीच केले नाही जे टीका करणारे आहेत त्यांची खा.राऊत यांच्या विकास कामांपुढे काहीच चालत नसल्याने येणं-केन प्रकारे बदनाम करणे हा उद्योग सध्या सुरु केला आहे.तो यापुढे बंद करावा असा सबुरीचा सल्लासुद्धा श्री बंगे यांनी दिला आहे
