कणकवली : कणकवली युवासेना उबाठाचे तालुकाप्रमुख उत्तम लोके यांनी दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर लागलीच दारिस्ते गावातील पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील रस्त्यामधील मोरी दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. दारिस्ते गावात सुरू असलेल्या पी एम जी एस वाय च्या रस्ता कामात बांधलेल्या मोऱ्या मजबूत नसून त्यांचा पाया निकृष्ट स्वरूपाचा असल्याची तक्रार उत्तम लोके यांनी केली होती. तसेच मोऱ्यांचे डायरेक्शन चुकीचे असल्यामुळे भविष्यात अपघात होण्याची शक्यता असल्याचीही तक्रार लोके यांनी केली होती. याबाबत वेळेत कार्यवाही न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा लोके यांनी दिला होता. उत्तम लोके यांच्या इशाऱ्यानंतर लागलीच पी एम जी एस वाय चे कार्यकारी अभियंता भोसले यांनी दखल घेत संबंधित मोऱ्यांच्या दुरुस्ती बाबत आदेश केले. त्यानुसार ठेकदाराने मोरी डायरेक्शन दुरुस्ती चे काम सुरू केले आहे.
युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोकेंच्या इशाऱ्यानंतर लागलीच पी एम जी एस वाय च्या कामातील दुरुस्तीला सुरुवात
