नेरूर कलेश्वर मंदिर येथील कायदेविषयक शिबिराला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

तालुका विधिसेवा समिती, दिवाणी न्यायालय आणि वकील संघाचे आयोजन :सुमारे १५० भाविकांनी घेतले कायदेविषयक मार्गदर्शन..

⚡कुडाळ ता.२७-: तालुक्यात नेरुर येथील कलेश्वर मंदीर येथे झालेल्या महाशिरात्री उत्सवात तालुका विधीसेवा समिती कुडाळ तथा दिवाणी न्यायालय कुडाळ यांच्या तर्फे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरास भावीकांचा उस्पुर्त प्रतिसाद मिळाला. सुमारे १५० भाविकांनी कायदेविषयक मार्गदर्शन घेतले.
सर्वसामान्य व्यक्तीना कायदयाची ओळख व माहिती मिळावी या उद्देशाने आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकारण सिंधुदुर्ग ओरोस यांचे निर्देशानुसार दिवाणी न्यायालय, (क. स्तर) कुडाळ, व कुडाळ तालुका वकील संघटना यांचे वतीने बुधवारी २६ फेब्रुवारी रोजी कुडाळ तालुक्यात जनजागृतीपर कायदेविषयक मार्गदर्शन शिबीराचे व मोबाईल व्हॅन लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते.
दिनांक २६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यत कुडाळ तालुक्यातील नेरुर येथील कलेश्वर मंदीर येथे झालेल्या महाशिवरात्री उत्सवात तालुका विधीसेवा समिती कुडाळ तथा दिवाणी न्यायालय कुडाळ तर्फे कायदेविषयक मार्गदर्शन शिबीराचे स्टॉल लावण्यात आला होता. या शिबीरात भावीकांना विधी सेवा प्राधिकरणामार्फत राबविणेत येणाऱ्या सर्वसामान्यासाठी असणाऱ्या योजना तसेच विविध कायदे याबाबत माहिती असलेली माहितीपत्रके वाटण्यात आली. तसेच विधी सेवा प्राधिकरणामार्फत राबविण्यातयेणाऱ्या योजनांची प्रत्यक्ष माहिती देण्यात आली. या शिबीरात १४० ते १५० भाविकांनी वैयक्तीक स्वरुपात माहितीचा लाभ घेतला.
या कार्यक्रमात दिवाणी न्यायाधीश (क. स्तर) कुडाळ जी.ए. कुलकर्णी व सहदिवाणी न्यायाधीश (क. स्तर) कुडाळ पी. आर. ढोरे यांनी या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन भावीकांना केले. कलेश्वर मंदीर नेरुर उत्सव समिती अध्यक्ष व इतर पदाधिकारी व सदस्य तसेच नेरुर ग्रामपंचायत सरपंच यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी होवून भाविकांचा उत्पुर्त प्रतिसाद मिळाला.

You cannot copy content of this page