सरपंच संतोष राऊळ:महेशजी सारंग यांच नांव बदनाम करण्याची हिंमत जर संजू परब यांचे मध्ये असेल तर त्यांनी कोलगांव जि.प. मधून निवडणूक लढवूनच दाखवावी..
⚡सावंतवाडी ता.२५-: शिवसेनेचे नेते संजू परब यांनी कोलगांव पंचायत समीती मतदार संघातील भाजप सह शिवसेनच्या कार्यकर्त्याचा केलेला शिवसेना पक्ष प्रवेश हा बिनबुडाचा व लोकांची दिशाभूल करणारा पक्ष प्रवेश होता. यावेळी पक्ष प्रवेश केलेल्या अनेक व्यक्ती हया पक्ष प्रवेशाच्या वेळी उपस्थितीतच नहोते. तसेच काही व्यक्ती हया कामानिमित्त बाहेर गांवी असतात. ज्या उपस्थीत व्यक्तींचा पक्ष प्रवेश घेण्यात आला हया व्यक्ती शिंदे शिवसेनेचे पूर्वीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आहेत. त्यामुळे संजू परब यांची रोजची स्टंटबाजी व दीशाभूल लोकांच्या समोर आली आहे. असा आरोप कोळगाव सरपंच संतोष राऊळ यांनी केला आहे.
ते पुढे म्हणाले नुकत्याच झोलल्या विधान सभेच्या निवडणूकीमध्ये जिल्हा बँक संचालक श्री. महेशजी सारंग यांनी शिवसेनेचे विदयामान आमदार दिपक केसरकर यांना संपूर्ण विधानसभा मतदार संघामध्ये केलेली मदत आमदार दिपक केसरकर व संजू परब विसरले काय? असा सवाल ही त्यांनी या उपस्थित केला आहे.
कोलगांव जि.प. मतदार संघामध्ये गेले अनेक वर्षे श्री.महेशजी सारंग यांच्या कार्याचा झंझावत पहाता व केलेल्या विकास कामांच्या जोरावर कोलगांव जि.प.मधील चारही ग्रामपंचायती या महेशजी सारंग यांनी एक हाती भाजपच्या चिन्हावर निवडून आणल्या. त्यामुळे संपूर्ण जि.प. मतदार संघ हा महेशजी सारंग यांच्या पाठीशी उभा राहीलेला आहे. त्यामुळे भाजपातील एकही कार्यकर्त्याने कधीच महेश सारंग यांची साथ सोडलेली नाही व सोडणार ही नाहीत. संजू परब यांनी कोलगांव जि.प. मध्ये शिवसेनेची ताकद वाढविण्याकरीता केलेला हा खोटा पक्ष प्रवेश आहे. फोडा फोडीचे खोटे राजकारण करून कोलगांव जि.प. व महेशजी सारंग यांच नांव बदनाम करण्याची हिंमत जर संजू परब यांचे मध्ये असेल तर त्यांनी कोलगांव जि.प. मतदार संघामधून निवडणूक लढवूनच दाखवावी. असे खुले आव्हान कोलगांव सरपंच श्री. संतोष राऊळ तसेच आंबोली मंडल उपाअध्यक्ष श्री. अशोक माळकर, शक्तीकेंद्र प्रमुख श्री. संदीप हळदणकर, कुणकेरी उपसरपंच श्री. सुनील परब यांनी केले.
