⚡मालवण ता.२५-:
मालवणच्या सागरातील सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवराजेश्वर देवस्थान न्यास तर्फे शिवराजेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या पायवाटेच्या दुतर्फा दगडी कठडा बांधण्यात आला तसेच पर्यटकांना शौचालयची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. दगडी कठडा व शौचालयाचे लोकार्पण श्रीराम सकपाळ यांच्या हस्ते या कामांच्या फलकांचे शिवजयंती दिनी अनावरण करून करण्यात आले.
सदर दोन्ही कामे शिवराजेश्वर देवस्थान न्यासचे अध्यक्ष सयाजी सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. विजय सकपाळ यांच्या हस्ते सयाजी सकपाळ यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी वायरी भूतनाथचे सरपंच भगवान लुडबे, मंगेश सावंत, भालचंद्र सकपाळ, किशोर पाडावे, नामदेव सकपाळ, राजाराम वायंगणकर, शिवबा सकपाळ, सिध्दार्थ सकपाळ, हनुमंत वायंगणकर, सचिन लोके, दत्ता सकपाळ, सागर फाटक, यश सकपाळ, हितेश वायंगणकर, दीपक फाटक, हेमंत वायंगणकर, केदार पाडावे, राजेश सावंत, दिगंबर कोरगांवकर, सुवर्णा पाडावे, नरेश सावंत, संतोष सकपाळ, प्रणव सावंत प्रसाद आडकर, रूद्र पाडावे, कुणाल परब, समीर खवणेकर, अंकुश रावले, गजानन रावले, श्रीकांत कोरगांवकर आदी व इतर उपस्थित होते.
