मराठी भाषा दिनानिमित्त बांद्यात “माझ्या आठवणीतल्या कविता” कार्यक्रमाचे आयोजन…

बांदा/प्रतिनिधी
येथील नट वाचनालयात गुरुवार दिनांक २७ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ४ वाजता कवी कुसुमाग्रज तथा वि.वा. शिरवाडकर यांचा जन्मदिन मराठी भाषा गौरवदिन म्हणून वाचनालयाच्या नाडकर्णी सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने ‘माझ्या आठवणीतल्या कविता’ हा सादरीकरणाचा कार्यक्रम होणार आहे. तसेच ग्रंथप्रदर्शन मांडण्यात येणार आहे. साहित्यप्रेमीनी या कार्यक्रमास अगत्य उपस्थित राहून आपली कविता सादर करावी असे आवाहन नट वाचनालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page