⚡सावंतवाडी ता.२५-: खासकीलवाडा येथील श्री देवी वटसावित्री महापुरुष मंदिराचा कलशारोहण आणि पुनः प्राणप्रतिष्ठा सोहळा १ ते ३ मार्च या कालावधीत साजरा होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यात १ मार्चला सकाळी ७.३० वा. प्रायश्चित्त, पुण्याहवाचन, नांदी श्राद्ध, जलाधिवास, शय्यावास, नवग्रह होम, वास्तू होम सायं. ७ वा. चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळ, कवठी यांचा दशावतार नाट्यप्रयोग, २ मार्चला स्थापित देवता पुजन, पर्याय होम, मुख्य देवता स्थापना, महापुजा, नेवैद्य, आरती, दुपारी १ वा. महाप्रसाद, सायं. ७ वा. मान्यवरांचा सत्कार समारंभ, सायं. ८ वा. अष्टविनायक दशावतार नाट्यमंडळ, निरवडे यांचा दशावतार नाट्यप्रयोग, ३ मार्च सकाळी अभिषेक पुजा, दुपारी १ वा. महाप्रसाद आदी कार्यक्रम होणार आहेत. तरी या सोहळ्यात सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन श्री देवी वटसावित्री महापुरुष कला क्रीडा मंडळ, खासकीलवाडा यांनी केले आहे.
