कणकवली : ओसरगाव येथे महामार्गालगत असलेल्या एका मैदानी भागात एका अज्ञात महिलेचा जळलेल्या स्थितीत मृतदेह सापडला आहे. ही घटना सोमवारी रात्री उघडकीस आली आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून नेमका हा मृतदेह कोणाचा आहे याबाबत अद्यापही कोणती माहिती समोर आलेली नाहीय.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पोलिसांनी महामार्गावर एमव्हीडी कॉलेजच्या पासून काही अंतरावर घटनास्थळी भेट देत पाहणी केली. रात्रीच या ठिकाणची फॉरेन्सिक तपासणी टीम दाखल झाली होती. ही महिला नेमकी कोण? तिचा घातपात की आत्महत्या? या महिलेचा घातपात करत तिला ओसरगाव मध्ये टाकले की कसे? तसेच या महिलेला या ठिकाणी टाकण्यामागची नेमकी कारणे काय? रात्री हा मृतदेह जळताना काहीनी पहिले. असे एक ना अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत.
याबाबत कणकवली पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.
