आ केसरकर यांनी मतदार संघातील कोरोनाचा घेतला आढावा..

समस्या सोडविण्याचे दिले आश्वासन मास्क, पी पी ई किट वाटप करण्याच्या दिल्या सूचना

*सावंतवाडी-:* कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर आज माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार दिपक केसरकर यांनी आज आपल्या मतदार संघातील तिन्ही तालुक्यांची आढावा बैठक घेतली होती. या बैठकीत जिल्हा शल्य चिकित्सक, तिन्ही तालुक्याचे तहसीलदार, वैद्यकीय अधिकारी, इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी तिन्ही तालुक्यातील रुग्ण संख्या जाणून घेत. प्रत्येक तालुक्यात उद्भवत असलेल्या समस्या जाणून घेत. त्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वसन दिले आहे. तसेच तिन्ही तालुक्यातील आरोग्य सुविधांचा आढावा घेत. आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्वरित निधी देण्याचे देखील जाहीर केले आहे. यामध्ये मास्क, पी पी ई किट, इत्यादी. वस्तू तातडीने उपलब्ध करून देण्याचे सांगितले आहे.

You cannot copy content of this page