नीरवडे प्रा आ केंद्रात कोरोना लससाठी गर्दी..

प. स सदस्य श्रीकृष्ण सावंत यानी जेष्ठांसाठी उपलब्ध केल्या खुर्च्या

*💫सावंतवाडी दि.२२-:* निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू असलेले लसीकरण मोहिमेला आज पंचायत समिती सदस्य श्रीकृष्ण उर्फ बाबु सावंत यांनी भेट दिली होती. यावेळी रुग्णालय परिसरामध्ये तासंतास उभ्या असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना प्रशासनामार्फत खुर्च्याची सोय उपलब्ध करुन दिली आहे. तसेच बिसलरी पाणीही उपलब्ध करुन दिले. तालुक्यात ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सध्या कोरोना लसीकरणास सुरु करण्यात आले आहे. याठिकाणी लस घेण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी होत आहे. निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये देखील लसीकरणासाठी ग्रामस्थांनी आज मोठी गर्दी केली होती. याठिकाणी दोनशे लस उपलब्ध झाल्याने आज सकाळपासून या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारित येणाऱ्या गावातील नागरिकांनी लस घेण्यासाठी गर्दी केली होती. याठिकाणी स्वॅब घेणे, दररोजची तपासणी, तसेच कोरोना लसीकरण सुरु आहे. त्यामुळे एकीकडे कर्मचारी तुटवडा आणि त्यात तासनतास ग्रामस्थांना याठिकाणी उभे राहावे लागत आहे. बसण्यासाठी तेथे अपुऱ्या खुर्च्या असल्याने ग्रामस्थ रस्त्यावर तसेच झाडाखाली उभे होते. याबाबतची माहिती पंचायत समिती सदस्य श्री सावंत यांना मिळताच त्यांनी प्राथमिक केंद्राला भेट देत. डाॅ.विक्रम मस्के यांची भेट घेतली. शिवाय स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाला फोन करुन याबाबत लक्ष वेधत रस्त्यावर तसेच रुग्णालय परिसरात उभा असणाऱ्या ग्रामस्थांना खुर्च्याची तसेच फॅनची व्यवस्था करा असे सांगितले. त्यानंतर याठिकाणी तात्काळ ग्रामपंचायत प्रशासनाकडून खुर्च्याची तसेच फॅनची व्यवस्था करुन देण्यात आली आहे. तसेच सावंत यांनी स्वखर्चाने सर्वासाठी बिसलरी पाण्याची व्यवस्थाही केली. यावेळी निरवडे ग्रामपंचायत सदस्य अर्जुन कुबल यांनीही सहकार्य दाखविले. याठिकाणी स्वॅब घेण्यासाठी आवश्यक असलेले ग्लासचे केबिन नसल्याचेही दिसुन आले त्यासंदर्भात तहसिलदार राजाराम म्हात्रे यांचे लक्ष वेधले. यावेळी ग्रामस्थांनी येण्याजाण्यासाठी हे अंतर जास्त असल्याने तसेच गाडीची व्यवस्था नसल्याने नजिकच्या उपकेंद्रात लस देण्याबाबत सोय करण्याची मागणी सावंत याच्याजवळ केली आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष वेधणार असे सावंत यांनी सांगितले आहे.

You cannot copy content of this page