व्ही. एन. नाबर इंग्लिश मिडीयम प्रशालेचा वार्षिक पारितोषिक वितरण उत्साहात संपन्न…!

⚡बांदा ता.१३-: येथील व्ही. एन. नाबर इंग्लिश मिडीयम प्रशालेचा वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी एस.एस.पी.एम गोवाचे संस्थापक तथा युवा उद्योजक अनंत वेरेणकर, संस्थेचे अध्यक्ष मंगेश कामत, महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. साक्षी वंजारी, आय.टी.आय महाविद्यालय सावंतवाडीच्या प्राचार्या सौ. सुचिता नाईक, वाय.पी.एज्युकेशन ट्रस्ट एस.एस.पी.एम.गोवाचे मॅनेजर आणि जनरल सेक्रेटरी त्रिविक्रम उपाध्ये, जॉईंट सेक्रेटरी ऍड. अमेय पारकर, शाळेचे गव्हर्निंग कौन्सिल मेंबर आणि उद्योजक नारायण उर्फ शशी पित्रे, भिकाजी धुरी, शाळेचा हेडबॉय गोविंद गावकर व हेडगर्ल श्रीशा सावंत आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व देवी सरस्वतीच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ. मनाली देसाई यांनी केले. पाहूण्यांची ओळख शिक्षिका सौ. दिक्षा नाईक यांनी करून दिली. वार्षिक अहवाल वाचन उपमुख्याध्यापिका सौ. शिल्पा कोरगावकर यांनी केला. श्री कामत यांनी आदर्श विद्यार्थी म्हणून मनिषकुमार माळी तसेच उत्कृष्ट ॲथलेट म्हणून रूद्र मोरजकर या विद्यार्थ्यांची नावे जाहीर केली व त्यांना गौरविण्यात आले.
तसेच यावर्षीच्या उत्कृष्ट शिक्षिका म्हणून सौ. कल्पना परब यांना गौरविण्यात आले. यावेळी मान्यवरांनी मनोगते व्यक्त केलीत. मान्यवरांच्या हस्ते शालेय वर्षातील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. सूत्रसंचालन शिक्षिका सौ. स्नेहा नाईक, रसिका वाटवे, लविना फर्नांडिस, सौ. दीक्षा नाईक यांनी केले. आभार सुरभी सावंत यांनी मानले.
फोटो:-
बांदा येथील व्ही एन नाबर प्रशालेत आयोजित पारितोषिक वितरण समारंभात विद्यार्थ्यांना गौरविताना मान्यवर.

You cannot copy content of this page