⚡बांदा ता.१३-: महायुती शासनाच्या माध्यमातून ‘क’ वर्ग पर्यटन स्थळ निधी मधून वाफोली माऊली मंदिर येथे पेवर ब्लॉग बसविणे या कामाचे भूमिपूजन देवस्थान प्रमुख हरी गवस यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी वाफोली सरपंच उमेश शिरोडकर, उपसरपंच विनेश गवस, देवस्थान समिती अध्यक्ष विलास गवस, मारुती गवस, भिकाजी गवस, अंकुश गवस, सचीन गवस, अनिल गवस, मंथन गवस, समीर पेळपकर, उमाजी गवस, विजय गवस, आत्माराम गवस, दशरथ गवस, ज्ञानेश्वर कांबळे, अशोक नाईक, ग्रामसेवक प्रसाद ठाकूर आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते.
या कामामुळे मंदिर परिसराच्या सुशोभीकरणात भर पडणार आहे. निधी उपलब्ध करून घेण्यासाठी उपसरपंच विनेश गवस यांनी विशेष प्रयत्न केलेत.
वाफोली माऊली मंदिर येथे पेवर ब्लॉग बसविणे कामाचे थाटात भूमिपूजन…!
