जिल्हा परिषद अध्यक्षाची मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट..

संजना सावंत यानी घेतला कोरोना आढावा

*💫सावंतवाडी दि.२१-:* मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्राला जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी भेट देऊन कोरोना संदर्भात आढावा घेतला.जिल्ह्यात कोरोना रूग्णांच्या सख्येत वाढ होत असून आरोग्य यंत्रणेवर ताण येत आहे.कोरोना चा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासन जोरदार प्रयत्न करत आहे. मंगळवारी दुपारी जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांनी मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन कोरोना संदर्भात कामाचा आढावा घेतला.या भेटीत आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील गावातील रुग्ण संख्येबाबत माहिती घेतली.तसेच कोरोना लसीकरण मोहिमेबाबत माहिती घेत जास्तीत जास्त लसीकरण कसे होईल यासाठी नियोजन करण्याच्या सूचना दिल्या.या वेळी रुग्ण कल्याण समिती कडून अध्यक्ष सावंत यांना मळेवाड केंद्राला रुग्णवाहिका नसल्याची माहिती देत अध्यक्षांकडे रुग्णवाहिका मिळावी अशी मागणी केली. तसेच जिल्हा परिषद कडून मळेवाड गावातील रस्त्यासाठी निधी द्यावा अशी मागणी सरपंच हेमंत मराठे यांनी अध्यक्षा सावंत यांच्याकडे केली असता रस्त्यासाठी निधी देण्याचे सावंत यांनी कबूल केले. सरपंच मराठे यांनी अध्यक्ष सावंत यांचे आभार मानले. यावेळी महिला बालकल्याण सभापती शर्वाणी गावकर, समाज कल्याण सभापती अंकुश जाधव, बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण, पंचायत समिती सभापती निकिता सावंत, तालुका वैद्यकीय अधिकारी वर्षा शिरोडकर,वैद्यकीय केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अदिती ठाकूर व डॉ. पावसकर उपस्थित होते. फोटो ओळ — जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांचे स्वागत करताना सभापती शर्वाणी गावकर

You cannot copy content of this page