खरीप भात लागवाडीसाठी ध्वनी चर्चासत्र संपन्न…

कृषि विज्ञान केंद्र किर्लोस व रिलायन्स फाउंडेशनचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी-:कृषी विज्ञान केंद्र , किर्लोस, मालवण, सिंधुदुर्ग व रिलायन्स फाउंडेशन सिंधुदुर्गच्या सयुक्त विद्यमाने कोरोना पार्श्वभूमीवर खरीप भात लागवडीबद्दल ध्वनी चर्चा सत्राद्वारे शेतकऱ्यांना घरबसल्या मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमध्ये किर्लोस कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ . भास्कर काजरेकर यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. शेतकऱ्यांना खरिप भातशेतीबद्दल नियोजनाची ईत्यंभूतं माहिती दिली. त्याचप्रमाणे विविध माध्यमातून शेतकऱ्यांनी माहिती मिळवून भात शेतीचे नियोजन करण्याचे आवाहन केले आहे. पुढे मार्गदर्शन करताना प्रा काजरेकर यांनी कृषी विज्ञान केंद्र किर्लोस सिंधुदुर्ग हे शेतकऱ्यांच्या पाठीशी मार्गदर्शन करण्यासाठी ठाम उभे आहे असे सांगितले. यावेळी कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. विवेक सावंत यांनी शेतऱ्यांना तण नियोजन , जमिनीची पेरणीपूर्व पूर्ण मशागत , खत नियोजन, गादी वाफा नियोजन, पारंपरिक पेरणी व गादी वाफा तयार करून केलेली शेती याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन केले. कृषि विज्ञान केंद्राचे विस्तार अधिकारी डॉ . विलास सावंत यांनी कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये मोलाचे मार्गदर्शन केले व शेतकऱ्यांनी शेतीविषयक माहिती मिळवण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र किर्लोस येथे शेतकऱ्यांनी ९४२२४४९०१८ येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा असे आवाहन केले. कार्यक्रमाचे व्यवस्थापन रिलायन्स फाउंडेशनचे रत्नागिरी जिल्हा व्यवस्थापक राजेश कांबळे यांनी केले. तसेच कार्यक्रमाची तांत्रीक बाजू रिलायन्स फाउंडेशनचे तेजस डोंगरीकर यांनी संभाळली. नियोजन गणपत गावडे यांनी केले. शेतीविषयक, पशुपलणा विषयी तांत्रिक माहितीसाठी रिलायन्स फाउंडेशनच्या टोल फ्री हेल्पलाइन क्रमांक १८००४१९८८०० क्रमांकावर सकाळी ९.३० ते संध्याकाळी ७,३० वाजेपर्यंत ( रविवार सोडून) संपर्क साधण्याचे आव्हान रिलायन्स फाउंडेशन कडून करण्यात आले आहे . कार्यक्रमाला शेतकरी बंधू आणि भगिनींचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. फोटो:-ध्वनी चर्चा सत्रात सहभागी मार्गदर्शक व शेतकरी

You cannot copy content of this page