परशुराम उपरकर:नाशिक ऑक्सीजन गळतीच्या पार्श्वभूमीवर केली मागणी
💫 *कणकवली दि.२१-:* नाशिक येथील हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन गळतीमुळे आज घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गमध्ये ऑक्सीजन प्लांट मध्ये काही समस्या निर्माण झाल्यास ती तात्काळ सोडविण्यासाठी तांत्रिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी मनसेचे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी प्रसिद्धपत्रकाद्वारे केली आहे.
