सतीश सावंत यांचा उजवा हात म्हणून काम करणार;नितेश राणे सोबतची ती भेट रस्त्यात झालेल्या गाठी भेटीची…
*💫कणकवली दि.२१-:* मी शिवसेना पक्षात प्रामाणिक काम करत आहे, शिवसैनिक म्हणून एकनिष्ठ आहे. कणकवली नितेश राणे सोबत झालेली भेट, ही फक्त औपचारिक आहे.राजकीय पक्षांतराची कुठलीही चर्चा नाही. त्यांच्या सोबत असलेल्या ओळखीतून त्यांनी मला हाक मारला,त्यानंतर मी काही मिनिटेच त्यांच्याशी बोललो. मात्र मी शिवसेना पक्ष सोडून कुठल्याही अन्य पक्षात जाणार नाही.सतीश सावंत यांचा उजवा हात म्हणून काम करणार आहे.माध्यमांमध्ये त्या आलेल्या बातम्या खोडसाळपणाचे असून माझ्याबद्दल गैरसमज पसरवण्यासाठी विरोधकांनी केलेला हा एक प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया शिवसेना जिल्हा परिषद सदस्य संजय आग्रे यांनी दिली. फोंडाघाट पाचोबा देवस्थान येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत,रामदास विखाळे, पंचायत समिती सदस्य मंगेश सावंत, माजी सभापती संदेश पटेल, आनंद मर्ये यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेना नेते खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक,आमदार दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे. बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचा राईट हँड म्हणून काम करणार आहे.रस्त्यामध्ये गाठी भेटी या होत असतात,त्या भेटीतून पक्षात प्रवेश होईल असा राजकीय अर्थ काढणे चुकीचे आहे. मी पक्षाशी प्रामाणिक आहे, फोंडाघाट विभागात शिवसेना बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.ज्या माध्यमांमध्ये या बातम्या आल्यात त्या खोडसाळपणाचे असून माझ्या बदल गैरसमज पसरवण्यासाठी विरोधकांनी केलेला एक प्रयत्न आहे,असल्याचा दावा शिवसेना जिल्हा परिषद सदस्य संजय आग्रे यांनी केला आहे.
