⚡देवगड ता.१०-:
तहसीलदार रमेश पवार यांचे देवगड तहसील कार्यालयात जंगी स्वागत करण्यात आले. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कालावधीत काही महिन्यांपूर्वी मुबंई येथे पवार यांची प्रशासकीय बदली झाली होती. मात्र पवार यांचा प्रशासकीय कामकाजातील अनुभव आणि लोकांभूमिख असलेल्या कामकाज पद्धतीमुळे विद्यमान पालकमंत्री नितेश राणे यांच्या शिफारसीने आर. जे. पवार यांची देवगड तहसीलदार म्हणून पुन्हा नेमणूक करण्यात आली आहे. आज दहा फेब्रुवारी रोजी त्यांनी देवगड तहसीलदार म्हणून पुन्हा एकदा पदभार स्वीकारला आहे.
देवगड तहसीलदार म्हणून कामकाज करताना काही महिन्यापुर्वीच पवार यांनी तहसील परिसर कपाउंड, अभ्यंगतांसाठी बैठक व्यवस्था आदी कामकाज करवून घेतले होते. जनतेचा तहसीलदार म्हणून सर्वसामान्य लोकात ओळख निर्माण असलेल्या पवार यांची देवगड तहसीलदार म्हणून नेमणूक झाल्याने देवगड तालुकावासियांमध्ये समाधान आहे.
देवगड कार्यालयात पवार यांचे आगमन होताच सर्व कर्मचारी यांनी प्रवेशद्वारातच स्वागत करून शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्व ऑपरेटर, अव्वल कारकून, महसूल सहायक, नायब तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर, सुरेंद्र कांबळे, श्री. गुटे, पुरवठा निरीक्षक बेबले, सेतू संचालक भाबल, ग्रा.महसूल अधीकारी, मंडळ अधीकारी उपस्थित होते.
देवगड तहसीलदार रमेश पवार यांनी स्वीकारला पदभार…
