सांगूळवाडी कोविड सेंटरला शिवसेना सदैव मदतीचा हात देणार-: सतीश सावंत…

वैभववाडी दि.२१:वैभववाडी तालुक्यात कोरोना संसर्ग वाढला होता.सध्या वैभववाडी तालुक्यात 226 कोरोना सक्रिय रुग्ण आहेत.कोरोना रुग्णांची सेवा व त्यांचे मनोधैर्य वाढविण्याचे काम आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी करत आहेत.वैभववाडी तालुका शिवसेनेना सांगूळवाडी येथील कोरोना रुग्णांसाठी घोषणा न करता मदतीचा हात सदैव दिला जाईल असे आश्वासन शिवसेना नेते तथा जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिले. सांगूळवाडी कोविड सेंटरमध्ये उपाचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांना वैभववाडी तालुका शिवसेनेना पक्षाच्या वतीने सकस आहार म्हणून 500 गावठी अंडी देण्यात आली. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख मंगेश लोके,नावळे माजी सरपंच संभाजी रावराणे,माजी जि. प.सभापती संदेश सावंत – पटेल,बंडू सावंत,देवानंद पालांडे, स्वप्नील धुरी,नितीन रावराणे,सत्यवान सुतार,सांगूळवाडी माजी सरपंच सुतार,तहसीलदार रामदास झळके,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल पवार,डॉ. मंदार पाटोळे,नायब तहसीलदार ए.के.नाईक,मंडळ अधिकारी पावसकर आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी डॉ. अनिल पवार म्हणाले,तालुक्यात गेले दोन दिवसात कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण संख्या निम्याने कमी झाला आहे.दिगशी गावात 94 रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह सापडले होते.सध्या त्यातील 50 % रुग्ण बरे झाले आहेत.45 कोरोना सक्रिय रुग्ण सांगूळवाडी येथील कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर आहे. तहसीलदार रामदास झळके म्हणाले,तालुक्यातील कोरोना रुग्ण संख्या कमी होत आहे.महसूल विभाग,आरोग्य विभाग,पोलीस विभाग हे सर्व समन्वय साधून काम करत आहेत.

You cannot copy content of this page