⚡वेंगुर्ला ता.०४-: वेताळ प्रतिष्ठानचे विश्वासार्ह आणि समर्पित कार्यकर्ते कै.गुरूदास तिरोडकर यांच्या अथक सेवेला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि त्यांच्या कार्याला अनोख्या पद्धतीने सन्मान देण्यासाठी वेताळ प्रतिष्ठान आणि सहयोगी संस्थांच्या तसेच कै.गुरूदास तिरोडकर मित्रपरिवारातर्फे १५ फेब्रुवारी रोजी उत्सव मंगल कार्यालय, तुळस येथे सकाळी ९ वा. महारक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.
वेताळ प्रतिष्ठानचे हे सलग २८ वे रक्तदान शिबिर असून या रक्तदान शिबिरासाठी सिद्धार्थ कलाविष्कार युवक मंडळ तुळस, आनंदयात्री वाङ्मय मंडळ, श्री देवी शारदा प्रतिष्ठान रामघाट, बाल गोवर्धन कला-क्रीडा मंडळ तुळस, सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग या सहयोगी संस्था म्हणून काम पहाणार असून रक्तपेढी सावंतवाडी आणि रक्तपेढी एस.एस.पी.एम. पडवे यांच्या सहकार्याने हे रक्तदान शिबिर घेण्यात येत आहे. सर्व रक्तदात्यांचा गुरूदास तिरोडकर स्मृतिप्रित्यर्थ मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात येईल. नावनोंदणी करण्यासाठी रक्तमित्र संघटक महेश राऊळ (९४०५९३३९१२) यांच्याशी संफ साधावा.
