बीच वर्कआऊट इव्हेंटला उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡वेंगुर्ला ता.०४-: वेंगुर्ला नगरपरिषद, युवक शरीरसौष्ठव संवर्धन संस्था, सातेरी व्यायामशाळा व सोन्सुरकर फिटनेस यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वच्छ वेंगुर्ला, सुंदर वेंगुर्ला व सुदृढ वेंगुर्ला‘ या संकल्पनेच्या अनुषंगाने २ फेब्रुवारी रोजी जलबांदेश्वर येथे विशेष ‘बीच वर्कआऊट इव्हेंट‘ घेण्यात आला. याला सर्वस्तरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

  उद्घाटन मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या हस्ते झाले. किशोर सोन्सुरकर व बाबली गवंडे यांनी उपस्थितांकडून योगासने, स्ट्रेचिग, कार्डिओ, क्रॉसफिट आदींची प्रात्यक्षिके करून घेतली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी श्री.सुकटे, लायनेसच्या अध्यक्षा पल्लवी कामत, ऊर्मिला सावंत, मृण्मयी केरकर, हेमा गावस्कर, अबोली सोन्सूरकर, अंकित सोन्सूरकर यांच्यासह नागरिक, व्यायामपटू, नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.  त्यानंतर बॅ.खर्डेकर महाविद्यालयाच्या एन.सी.सी.कॅडेट्सनी नवाबाग समुद्रकिनारी स्वच्छता उपक्रम राबवून वर्गीकृत स्वरूपात कचरा संकलित केला.
You cannot copy content of this page