⚡बांदा ता.०४-: डेगवे येथील माध्यमिक विद्यालयाच्या वर्ष १९८२-८३ या वर्षातील इयत्ता दहावीच्या बॅचचे विद्यार्थी तब्बल ४३ वर्षानंतर स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आलेत. बांदा येथील ‘हाय व्हॅली जंगल रिसॉर्ट’ मध्ये संपन्न झालेल्या एकदिवशीय स्नेहमेळाव्यात सवंगड्यानी अनेक आठवणी जागविल्या. यावेळी ४२ विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते.
मेळाव्याचा प्रारंभ श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन करून व पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. संतोष देसाई यांनी
स्नेहमेळाव्याचा उद्देश सांगून प्रास्ताविक केले. यानंतर अनेकांनी मनोगते व्यक्त केलीत. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झालेत. यावेळी सर्व माजी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यानंतर सनातन संस्थेचे साधक शिवराम देसाई यांनी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा आणि सनातन संस्थेचे कार्य यांचा परिचय करून दिला. तसेच ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर मार्गदर्शन केले. ‘नामस्मरणामुळे जीवनातील अनेक समस्यांचे निवारण होते’, असे सांगून काळानुसार ‘नामजप’ आणि ‘अध्यात्मप्रसार’ ही सर्वश्रेष्ठ साधना आहे श्री. देसाई यांनी समजावून सांगितले. त्यानंतर उपस्थितांनी ‘जीवन साधनेचे महत्त्व पटले. आम्ही नामस्मरण आदी साधना करतो’, असे उत्स्फूर्तपणे अनेकांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचाल संजय मिंचेकर यांनी केले. आभार सुनील सावंतयांनी मानले. स्नेहमेळाव्याचे नियोजन विलास देसाई यांनी केले.
यावेळी दिवसभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करत माजी विद्यार्थ्यांनी स्नेहमेळावा यादगार बनविला.
बांदा येथील ‘हाय व्हॅली जंगल रिसॉर्ट’ मध्ये १९८२-८३ च्या दहावीच्या बॅचचा स्नेहमेळावा संपन्न…!
